Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘समाधान शिबिर’ ठरतेय जनतेसाठी दिलासादायक; 460 लाभार्थ्यांना थेट लाभ – पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे प्रतिपादन
    जळगाव

    ‘समाधान शिबिर’ ठरतेय जनतेसाठी दिलासादायक; 460 लाभार्थ्यांना थेट लाभ – पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे प्रतिपादन

    saimat teamBy saimat teamApril 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    समाधान शिबिर तरसोद जळगाव
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    शासनाच्या दारात जनतेने फिरू नये, तर सरकारच जनतेच्या दारी जावे या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हे खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी दिलासादायक ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे शिबिर म्हणजे स्वराज्याच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे जनआंदोलन असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

    तरसोद सर्कल अंतर्गत आयोजित या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली, तर जिल्हा परिषद शाळा तरसोद येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले. प्रास्ताविकात महसूल अधिकारी रुपेश ठाकूर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन मोनाली लंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सर्कल अधिकारी मिलिंद देवरे यांनी मानले.

    या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. महिला बचत गटांना कर्जवाटप, रेशन कार्ड सेवा, सातबारा उतारे व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान अद्ययावत सेवा तसेच कृषी व समाजकल्याण विभागाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरिकांनी घेतला. यावेळी तरसोद येथे 28 घरकुलांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देत उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे प्रस्तावही तातडीने मंजूर करून प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

    शिबिरात एकूण 460 लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. यामध्ये 38 डोमिसाइल प्रमाणपत्रे, 97 डिजिटल सातबारा, 44 सातबारा दुरुस्ती, 16 जात प्रमाणपत्रे, 19 संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ, 22 वारस नोंदी, 92 उत्पन्न दाखले तसेच 28 घरकुल मंजुरीचा समावेश होता. याशिवाय 60 फार्मर आयडी, 12 कृषी लाभार्थी, 21 वैद्यकीय सुविधा लाभार्थी यांनाही लाभ मिळाला. महिला बचत गटातील 11 लाभार्थ्यांना एकूण 23 लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

    या उपक्रमासाठी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. सुमारे 900 ते 950 नागरिकांनी शिबिराला उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचत असल्याने प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

    या कार्यक्रमास तहसीलदार शीतल राजपूत, नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, प्रशांत निंबोडकर, सरपंच संतोष सावकारे, उपसरपंच मनीषा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, मंदिर देवस्थान समिती पदाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

    460 beneficiaries Department Camp Digital Satbara Gharkul scheme Government scheme benefits Government Schemes Maharashtra gulabrao patil Jalgaon Latest News Jalgaon News PM Kisan Yojana Ration Card Update Revenue Rural Development Maharashtra Sarkar Tumchya Daari Solution Camp Tarsod Tarsod News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Gulabrao Patil : “पाणी बचतीचा संदेश ते महिला सक्षमीकरणापर्यंत; मंत्री गुलाबराव पाटलांची विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका”

    April 17, 2026

    तांबापूर ९ तास अंधारात; संतप्त नागरिकांचा रस्त्यावर उद्रेक, रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

    April 17, 2026

    Jalgaon : उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.