Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Jalgaon : नानाश्री फाऊंडेशनची संघभावनेतली कमाल
    Uncategorized

    Jalgaon : नानाश्री फाऊंडेशनची संघभावनेतली कमाल

    saimatBy saimatApril 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये मिळवले तिसरे बक्षीस

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी

    जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात नानाश्री फाऊंडेशन संघाने आपल्या अफलातून सांघिक कामगिरीने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले. किरण पाटील युवा मंच सतखेडा संघ विजेतेपदावर उभा राहिला तरीही नानाश्री फाऊंडेशनने आपल्या दमदार कामगिरीने तिसरे बक्षीस जिंकत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवला.

    जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या आयोजनाखाली १ ते ५ एप्रिल दरम्यान शिवतीर्थ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल २२ संघांनी भाग घेतला. नानाश्री फाऊंडेशन संघाचे नेतृत्व जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे आणि युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांनी केले.

    स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नानाश्री फाऊंडेशनने चंद्रावर्षा इंटरप्रायजेस संघाला ९ बळीवर रोखत एकतर्फी विजय मिळवून आपल्या स्पर्धेचा विजयी शुभारंभ केला. दुसऱ्या सामन्यात फलंदाजांच्या धडाकेबंद खेळामुळे श्री कन्स्ट्रक्शन संघाचा २२ धावांनी पराभव झाला आणि संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. उपांत्यपूर्व फेरीत गजानन बापू युवा मंच संघावर १४ धावांनी विजय मिळवून त्यांनी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

    उपांत्य फेरीत किरण युवा मंच संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे विजेतेपदाचे स्वप्नभंग झाले, मात्र संघाने खचून न जाता तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात स्व. संभाजी आबा फाऊंडेशन संघावर सुपरओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला.

    या स्पर्धेत रुपेश चौधरीने धमाकेदार फलंदाजी करत २ अर्धशतकांसह २१३ धावा ठोकल्या, तर शशांक पाटील यांनी १६ षटकारांसह १३० धावा करत ८ बळी घेतले. भूषण चव्हाण (५२ धावा व ५ बळी), विशाल राजपूत (४ बळी) आणि शुभम पाटील (३ बळी) यांनीही आपला अष्टपैलू खेळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

    नानाश्री फाऊंडेशन संघाने आपली लढाऊ वृत्ती, संघभावना आणि जिद्दीचा खेळ दाखवत या स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध करणारी ही कामगिरी जळगाव ग्रामीण लीगच्या इतिहासात नक्कीच लक्षात राहणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    आईचा थरारक निर्णय; मुलीचा गळा दाबून विहिरीत उडी – ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    April 3, 2026

    Accident : भीषण अपघात; ५०० फूट दरीत ट्रक कोसळून बाप-लेकाचा मृत्यू

    April 2, 2026

    Black Magic : काळी बाहुली व रिंगणाने भीतीचे वातावरण; जावयाच्या कृत्याने सासरच्या घरासमोर खळबळ

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.