Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नवी दिल्ली»राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार टीका; एलपीजी तुटवड्यामुळे प्रवासी मजुरांवर उपासमारीची भीती
    नवी दिल्ली

    राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार टीका; एलपीजी तुटवड्यामुळे प्रवासी मजुरांवर उपासमारीची भीती

    saimatBy saimatApril 6, 2026Updated:April 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोव्हिड काळाप्रमाणे धोरणशून्य कारभार; गरीब आणि प्रवासी मजुरांना स्वयंपाकासाठी सिलिंडरही मिळत नाही

    साईमत / नवी दिल्ली 

    देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून स्वयंपाकासाठी नागरिकांना सिलिंडर मिळत नाही, अशी गंभीर स्थिती उभी आहे. यावर विरोधक म्हणून सतत आवाज उठवत आहोत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही पावलं उचलत नसल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.

    राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एलपीजी तुटवड्याबाबत कुठलंही धोरण नाही. लोकांकडे चूल पेटवायलाही पैसे नाहीत. तरीही पंतप्रधानांचा कारभार कोव्हिड काळातील नीतीशून्य कारभारासारखाच आहे.” एलपीजीच्या तुटवड्यामुळे सर्वाधिक फटका गरीब लोकांना आणि प्रवासी मजुरांना बसला आहे, असेही त्यांनी सांगितले.

    राहुल गांधींच्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, ५०० ते ८०० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रवासी मजुरांचं जीवन अत्यंत कठीण झाले आहे. स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळत नसल्यामुळे हे लोक घराकडे परतत असताना चूल पेटवायलाही पैसे उरलेले नसतात. त्यामुळे प्रवासी मजूर शहर सोडून गावाकडे जात आहेत. “जे मजूर फॅक्टरी आणि टेक्स्टाईल मिल्सचा कणा आहेत, ते आज उद्ध्वस्त होत आहेत. उत्पादनात वाढ झाली असताना, ही नवीन संकटं निर्माण झाली आहेत,” अशी टीका राहुल गांधींनी केली.

    याशिवाय, महागाई वाढणे, उत्पादन कमी होणे आणि एलपीजी सिलिंडरची टंचाई यामुळे प्रवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, मात्र सरकारने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही, असेही राहुल गांधींनी म्हटले.

    देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून, आता भाजपाकडून राहुल गांधींच्या टीकेला काय उत्तर मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Mumbai Terror : मुंबईतून दोन दहशतवाद्यांना अटक; दिल्लीत संभाव्य मोठा हल्ला टाळला

    April 6, 2026

    Sunetra Pawar Speech : “अजितदादांची पत्नी आणि चारवेळा मुख्यमंत्री साहेबांची सून” – बारामतीत सुनेत्रा पवार भावूक

    April 6, 2026

    Pakistan Threat Attack Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी : “भारताने हल्ला केला, तर आम्ही थेट कोलकात्यावर हल्ला करू!”

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.