Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ
    जळगाव

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    saimatBy saimatMarch 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / जळगांव / प्रतिनिधी

    राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

    सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सुमारे २२७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानुसार महिला व बालविकास विभागामार्फत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण तांत्रिक प्रक्रियेद्वारे सुरू झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना ही महत्वाकांक्षी योजना असून, या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाते.

    दरम्यान, जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bikaner Express : शिर्डी–बिकानेर विशेष गाडीचा कालावधी वाढविला; भाविकांना मोठा दिलासा

    March 27, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.