Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jamner:वाकोदमध्ये भीषण अपघात; बसने बैलगाडी चिरडली, शेतकरी जिवंत
    क्राईम

    Jamner:वाकोदमध्ये भीषण अपघात; बसने बैलगाडी चिरडली, शेतकरी जिवंत

    saimatBy saimatMarch 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jamner: Terrible accident in Wakod; Bus crushes bullock cart, farmer survives
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बैलगाडी चक्काचूर; वाकोद शेतकऱ्याचा पुनर्जन्म

    साईमत /जामनेर/ प्रतिनिधी

    जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद येथे बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. पुण्याकडे जात असलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडी चक्काचूर झाली, मात्र बैलगाडीवरील शेतकरी आश्चर्यकारकरीत्या बचावला. घटनेचे थरारक व्हिडीओ जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, जे पाहून अंगावर काटा येतो.

    मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजता जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी बस अतिवेगाने जात होती. वाकोद गावाजवळ, रस्त्याच्या कडेला एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन उभा होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने थेट बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

    धडक इतकी भीषण होती की बैलगाडीचे लाकडी भाग हवेत उडाले आणि गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्ये पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. मात्र, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे, बैलगाडीवरील शेतकरी या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर पडला.

    अपघातानंतर वाकोदच्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. महामार्गावरील वाहनांच्या वेगामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे सांगत त्यांनी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण केला.

    सदर घटना आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ग्रामस्थ आणि नागरिक महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.

    या घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला पुन्हा एकदा सतर्क केले आहे, आणि येत्या काळात मार्गावर नियंत्रण व सुरक्षिततेसाठी विशेष पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026

    Jalgaon Murder : जळगावात कौटुंबिक वादाचा अंतःस्थळ: पत्नीची लोखंडी विळ्याने निर्घृण हत्या

    March 19, 2026

    Murder : बकरी हत्येच्या संशयातून खून; २१ वर्षांनंतर फरार आरोपी पनवेलमधून अटकेत

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.