Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नंदूरबार »Nandurbar/Taloda: बिबट्याच्या हल्ल्यानंतर तळोदा परिसरात भीतीचे वातावरण
    नंदूरबार 

    Nandurbar/Taloda: बिबट्याच्या हल्ल्यानंतर तळोदा परिसरात भीतीचे वातावरण

    saimatBy saimatMarch 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Nandurbar/Taloda: Atmosphere of fear in Taloda area after leopard attack
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ग्रामस्थांचे आवाहन वन विभागाने तातडीने पिंजरा लावा

    साईमत/नंदुरबार/तळोदा / प्रतिनिधी     

    तळोदा शहराच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा वावर वाढल्याचे समोर आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडील घटनेत एका प्राण्याचा बळी गेल्यामुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत.

    १६ मार्च २०२३ रोजी, सोमवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास, शेतकरी राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतालगत असलेल्या आमराईत झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला.

    घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या तेथून पळून गेला, मात्र काही वेळानंतर तो पुन्हा त्या ठिकाणी दिसून आला. स्थानिकांनी सतर्कता दाखवत आवाज करून त्याला दूर पळवून लावले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बिबट्या दोराला अडकलेल्या शेळीवर ताव मारत असल्याचे दृश्य पाहून परिसरातील भीती वाढली आहे.

    या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच लोकवस्तीच्या जवळ त्याचा वाढता वावर लक्षात घेता, लहान मुले, महिला आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.

    वनविभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्री एकटे बाहेर न जाणे, पाळीव प्राण्यांची सुरक्षित व्यवस्था करणे आणि बिबट्याचा कोणताही मागोवा आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

    या घटनेनंतर तळोदा शहराच्या आजूबाजूच्या भागात नागरिकांची सतर्कता वाढली असून, बिबट्याच्या वावरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Maharashtra Weather : गुढीपाडव्याला मुंबईसह राज्यभरात पावसाचा इशारा

    March 17, 2026

    तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; चौघे गंभीर जखमी

    March 15, 2026

    Amalan school, Balkisan Thombare : नवापूर तालुक्यातील आमलाण शाळेचे शिक्षक बाळकिसन ठोंबरे यांना पुरस्कार जाहीर

    September 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.