Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू
    क्राईम

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    saimatBy saimatMarch 5, 2026Updated:March 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Yaval Sakli: Yaval Sakli bridge collapses due to dog, youth dies
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्यामुळे अपघात तरुणाचा मृत्यू

    साईमत/यावल /प्रतिनिधी

    तालुक्यातील साकळी फाट्याजवळ बुधवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात लोहाराच्या ३५ वर्षीय जुल्फिकार ईसा तडवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहिती नुसार, रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि गंभीर अपघात झाला. यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जुल्फिकार तडवी (वय ३५, रा. लोहारा, ता. रावेर, जि. जळगाव) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-१९ डीजी-९५२३ वरून यावल ते मोहना मार्गावर जात होते. बुधवारी (४ मार्च) रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास साकळी फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला, ज्यामुळे नियंत्रण सुटले आणि ते गंभीरपणे जखमी झाले.

    स्थानिकांनी तातडीने जुल्फिकार तडवी यांना ग्रामीण रुग्णालय, यावल येथे दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती साजीद हमिद तडवी (वय २२, व्यवसाय – फोटोग्राफर, रा. मोहना, ता. चोपडा) यांनी यावल पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक १४/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

    स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली असून प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026

    Jalgaon:जळगावमध्ये ३४ जप्त वाहनांचा जाहीर लिलाव १२ मार्च रोजी तहसील कार्यालयात

    March 5, 2026

    Jalgaon : शहरातील महामार्ग व समांतर रस्ते अतिक्रमणमुक्त

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.