Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Bhusawal : दुचाकी पार्किंगच्या वादातून व्यापाऱ्यावर जमावाची बेदम मारहाण
    क्राईम

    Bhusawal : दुचाकी पार्किंगच्या वादातून व्यापाऱ्यावर जमावाची बेदम मारहाण

    saimatBy saimatMarch 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Bhusawal: Mob brutally beats up businessman over two-wheeler parking dispute
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळात गुरुद्वारासमोर घडली घटना; बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    साईमत/भुसावळ /प्रतिनिधी:

    शहरातील संगतसाहेब गुरूद्वारा समोर दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एका कापड व्यापाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३ मार्च) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोनुसिंग दिपसिंग बावरा (वय ४२), रा. भुसावळ, हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या कामानिमित्त गुरुद्वाराजवळ आले होते. त्यांनी आपली दुचाकी संगतसाहेब गुरुद्वारासमोर पार्क करून उभी केली. याच कारणावरून संशयित भुषण मिस्तरी उर्फ बॉबी, प्रसाद किनगे उर्फ खब्या व त्यांच्या सोबत असलेल्या १० ते १५ जणांच्या जमावाने संताप व्यक्त करत सोनुसिंग बावरा यांना शिवीगाळ केली.

    वाद वाढत जाताच संबंधितांनी एकत्रितपणे बावरा यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत बावरा यांनी तत्काळ भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

    तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित संशयितांसह जमावाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोहेकॉ तेजस पारिस्कर करीत आहेत. या घटनेमुळे शहरात किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या जमावबाजीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ आंबेडकर नगरात जुन्या वादातून तरूणावर मारहाण

    March 4, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद मुलीचा शोध सुरू

    March 4, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी दोन जखमी

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.