Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Muktainagar : उड्डाणपुलासाठी साठवलेला माल चोरीला चोरट्यांचा वाहनातून पलायनाचा संशय
    क्राईम

    Muktainagar : उड्डाणपुलासाठी साठवलेला माल चोरीला चोरट्यांचा वाहनातून पलायनाचा संशय

    saimatBy saimatFebruary 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Muktainagar: Goods stored for the airport bridge stolen; Thieves suspected of fleeing in a vehicle
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हरताळा फाट्यावर लोखंडी साहित्याची चोरी; मुक्ताईनगरात दीड लाखांचा माल लंपास

    साईमत/मुक्ताईनगर /प्रतिनिधी

    शहरालगतच्या हरताळा फाटा परिसरात उड्डाणपुलाच्या कामासाठी साठवून ठेवलेल्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लोखंडी ट्रसल, अँगल आणि चॅनल असा सुमारे दीड लाख रुपयांचा माल लंपास केल्याने व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    हरताळा फाटा येथे उड्डाणपुलालगत सुरू असलेल्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी चॅनल, अँगल व ट्रसल साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. हे साहित्य बांधकाम प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांकडे होती. मात्र, चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने रात्रीच्या सुमारास साहित्य चोरून नेल्याचे दिसून येत आहे.

    सकाळी ठेकेदार व कामगार घटनास्थळी पोहोचले असता साहित्य गायब झाल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती देण्यात आली. चोरी झालेल्या साहित्याची किंमत सुमारे दीड लाख रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    घटनेची लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चोरट्यांनी वाहनाच्या सहाय्याने हे जड साहित्य नेले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

    दरम्यान, मुक्ताईनगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांना तातडीने अटक करावी तसेच वाढत्या चोरीच्या घटनांवर लगाम लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon: दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा अवघ्या १२ तासांत जेरबंद

    February 21, 2026

    Jalgaon : शिक्षणासाठी वेटरचे काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    February 21, 2026

    जळगाव: तरुणाचा विषप्राशनातून दुर्दैवी मृत्यू

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.