Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
    राज्य

    वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

    saimat teamBy saimat teamOctober 30, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी केली.

    त्यानुसार वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना १२ हजार, तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये बोनस देण्यात येणार आहे.सुरुवातीला वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांना वगळून १० हजार रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी बोनस देण्याची घोषणा केली.

    वीज बिलाची प्रचंड थकबाकी, सरकारकडून पाणीपुरवठा, पथदिवे यांच्याकडून न मिळालेले अर्थसाहाय्य तसेच कोळसा कंपनीची थकबाकी, वीज निर्मिती करणाऱ्या शासकीय आणि खासगी कंपन्यांची प्रलंबित देयके, कृषिपपांची नगण्य वीज वसुली इत्यादी कारणांमुळे सध्या तिन्ही कंपन्या अत्यंत बिकट अशा आर्थिक संकटातून वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीतही आर्थिक परिस्थितीचे भान ठेवूनही कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

    कोरोनाच्या काळात तिन्ही कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून महाराष्ट्रातील जनतेला अखंडित वीजपुरवठा दिला. तसेच महापुराच्या अभूतपूर्व संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत केला, अशा शब्दांत राऊत यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Metro accident : मुलुंड मेट्रो अपघात मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आणि ५ लाखांची मदत जाहीर

    February 14, 2026

    Mumbai-Pune : मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेची २२ तासांची जॅम

    February 4, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.