Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon (Nashirabad) : टोलनाक्याजवळ मृत्यूचा थरार; भरधाव इनोव्हा दुभाजक तोडून कंटेनरवर आदळली
    क्राईम

    Jalgaon (Nashirabad) : टोलनाक्याजवळ मृत्यूचा थरार; भरधाव इनोव्हा दुभाजक तोडून कंटेनरवर आदळली

    saimatBy saimatJanuary 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon (Nashirabad): Death scare near toll plaza; Speeding Innova breaks through divider and hits container
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळच्या तरुणीचा जागीच अंत

    साईमत/ जळगाव (नशिराबाद)/प्रतिनिधी–

    जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कारचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात भुसावळ येथील २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात कारमधील एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळच्या दिशेने निघालेली इनोव्हा कार (क्र. एमएच १९ बीयू ७१८६) नशिराबादजवळील टोलनाक्याजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेगात असलेली कार महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत शिरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनरला (क्र. जीजे ०१ डीएक्स ९४९७) ती जोरात धडकली. धडकेचा आवाज एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.

    या अपघातात कारमध्ये प्रवास करत असलेल्या झोया नदीम पठाण (वय २२, रा. भुसावळ) या तरुणीला गंभीर दुखापत झाली असून तिचा जागीच मृत्यू झाला. तर भुसावळ येथील प्रसिद्ध ‘सोना डेअरी’चे संचालक यांच्या मुलगा अरबान खान (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

    अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, नशिराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

    ऐन रात्री महामार्गावर घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वेग आणि निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा एका तरुणीचा जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळहून सांगलीसाठी निरंकारी संत समागम स्पेशल रेल्वेला हिरवा झेंडा

    January 23, 2026

    Jalgaon : जळगाव हादरले आजाराने थकलेल्या ३४ वर्षीय तरुणाने घेतली गळफास घेऊन आत्महत्या

    January 23, 2026

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.