५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी
साईमत /जळगाव/प्रतिनिधी : –
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (दि. १३ जानेवारी २०२६) निवडणुकीची औपचारिक घोषणा केली. निवडणुकीत मतदान ५ फेब्रुवारी रोजी होईल तर मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या आरक्षणाचा प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या जिल्हा परिषद
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या १२ जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे.
निवडणूक वेळापत्रक
-
नामनिर्देशन (पत्र स्वीकारणे) – १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
-
छाननी – २२ जानेवारी २०२६
-
उमेदवारी माघारी अंतिम मुदत – २७ जानेवारी २०२६
-
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप – २७ जानेवारी २०२६, दुपारी ३:३० नंतर
-
मतदान – ५ फेब्रुवारी २०२६
-
मतमोजणी – ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० वाजता
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत राजकीय पक्षांसह अनेक स्वतंत्र उमेदवार देखील भाग घेणार आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदान केंद्रांची तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि मतदार यादींचे अपडेट सुनिश्चित केले आहे.
या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची रणनीती, स्थानिक राजकारणातील बदल आणि आगामी स्थानिक विकासासाठी निवडणुकीचे महत्त्व यावर सर्वसामान्य जनतेचे लक्ष असेल.
