Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पारोळा»Parola:वंजारी खुर्द गामस्थांच्या स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण
    पारोळा

    Parola:वंजारी खुर्द गामस्थांच्या स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण

    Milind KolheBy Milind KolheJanuary 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Parola: The pending demand for a crematorium for the Wanjari Khurd Gamasthas has finally been fulfilled.
    Oplus_131072
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहा लाखाच्या निधी मंजूर

    साईमत /पारोळा/ प्रतिनिधी

    तालुक्यातील वंजारी(महाराणा प्रताप नगर) येथे गेल्या सात वर्षापासून स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे.स्मशानभूमी बांधकामासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत व आमदार अमोल पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

    तालुक्यातील वंजारी खुर्द महाराणा प्रतापनगर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमीची व्यवस्था नव्हती.
    दीर्घकाळापासून स्मशानभूमीच्या अभावामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.येथील ग्रामस्थांनी या समस्येवर प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष ही वेधले.यासाठी काही वेळा उपोषण‌,आंदोलन केले तर १५ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने याकडे लक्ष वेधले.आमदार अमोल पाटील यांनी यासाठी शासनाकडे अहवाल सादर केला होता.

    गावकऱ्यांच्या भावनिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन आज निधी मंजूर झाल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम हा पार पडला.याप्रसंगी जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील,तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शहरप्रमुख अमृत चौधरी,शेतकी संघाचे मा. अध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक नितीन सोनार,पंकज मराठे,आडगाव येथील महेश मोरे,मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील यांचेसह वंजारीचे सरपंच भैय्या राजपूत,उपसरपंच वनमाला राजपूत वंजारी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध झाल्याने भविष्यात अंत्यविधी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर होणार असून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह,आनंद पसरून समाधान व्यक्त करण्यात आले.आनेक वर्षापासूनची या मागणीला पूर्णविराम लागला आहे.

    ग्रामस्थांच्या भावना व न्याय देण्याची भूमिका जाणून आमदार अमोल पाटील यांनी १० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी आमदार अमोल पाटील यांचे आभार मानले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    Parola:पारोळ्यात ‘खाना खजाना’ आनंद मेळावा उत्साहात

    December 31, 2025

    Parola : शेतीच्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस

    December 24, 2025

    Parola : गोवंशाला शौचखड्ड्यातून बाहेर काढून दिले जीवदान

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.