३५० पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी परिचय करून दिला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
“मांगल्य” वधु-वर सुचक केंद्र जळगाव, धनगर समाज महासंघ मल्हार सेना अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटना यांच्यातर्फे आयोजित राज्यव्यापी सर्व शाखीय धनगर समाज वधु-वर परिचय मेळावा जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी शिवार याठिकाणी २८ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी अकोलाचे सेवानिवृत्त अधिकारी केशव पातोंड होते. त्यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे व लग्न समारंभासाठी होणाऱ्या अमाप पायबंद घालावा व जुनी आहेर देणे घेणे पद्धत बंद करावी, असे मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमांमध्ये ३५० पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. ३० वर्षापासून मांगल्ये वधु-वर सुचक केंद्राचे संचालक रेखा न्हाळदे व प्रभाकर न्हाळदे हे सेवा व्रत चालवत आहेत, असे संदीप तेले यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट करून दिले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद देशमुख, विशाल भोळे, सुभाष सोनवणे, नानाभाऊ बोरसे, राहुल इधे, रमेश सुलताने, रमेश सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष धनगर समाज महासंघ सुभाष करे, रामचंद्र चऱ्हाटे, अरुण ठाकरे, धनगर महासंघाचे अध्यक्ष दिलीप धनगर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, जिल्हा सरचिटणीस संतोष कचरे, जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, हिरामण सावळे, जयेश कुयटे, सदाशिवराव ढेकळे, वसंत भालेराव, रामचंद्र निळे, हरिभाऊ हिवराळे, अहिल्या महिला संघ विभागीय अध्यक्ष मंजुषा सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष प्रमिला कंखरे उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी नामदेव सावळे, प्रमोद सोनवणे, डिगंबर सोनवणे, महेंद्र सोनवणे, प्रवीण पवार, सुनील खोमणे, हर्षल पवार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आयोजक मांगल्ये वधु-वर सुचक केंद्राच्या संचालिका रेखा न्हाळदे, प्रभाकर न्हाळदे होते. सूत्रसंचालन गणेश बागुल, तुळशीराम सोनवणे तर आभार धर्मा सोनवणे यांनी मानले.
