पशुवैद्यकीय डॉक्टरांनी जनावरांना लस दिली
साईमत /जामनेर /प्रतिनिधी
माळपिंप्रीत किसान सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. हा उपक्रम डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्ष २०२५-२६ साठी आयोजित केला होता.कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, समन्वयक प्रा.बी.एम.गोनशेटवाड, कार्यक्रमाधिकारी प्रा.व्ही.एस.पाटील आणि प्रा.पी.एस.देवरे यांनी केले. तसेच मोहाडी, पळसखेडे आणि देवपिंपरी येथील कृषी दूतही सहभागी झाले. ग्रामपंचायत आवारात लसीकरणाला सुरुवात झाली.
सरपंच किरण पाटील आणि पशुवैद्यकीय डॉ.अमोल वऱ्हाडे व डॉ.रवींद्र बिझोटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात एफ.एम.डी.या रोगाच्या लक्षणांबाबत अमीन मुजावर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण सोनवणे यांनी लसीकरणाचे फायदे व प्रतिबंधक उपाय सांगितले. तर किरण इंगळे यांनी लसीकरणाची पद्धत आणि व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
त्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी जनावरांना लस दिली.कार्यक्रमाच्या शेवटी बाप्पू काळबैले यांनी कृषी दुतांनी असेच उपक्रम राबवत राहावे, असे आवाहन केले. तर महेश पाटील यांनी गावकरी मंडळी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
