शिबिरात ६५ स्काऊट, ७० गाईड अशा १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात दोन दिवशीय शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. शिबिरात ६५ स्काऊट व ७० गाईड अशा १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बंडू काळे, सचिव लीलाधर नारखेडे, समन्वयिका प्रतिभा खडके, उद्योजक ज्ञानदेव काळे, जिल्हा स्काऊट ट्रेनिंग आयुक्त रवींद्र कोळी, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे स्काऊट मास्टर किशोर पाटील, मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजवंदनाने व बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आणि दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली.
शिबिरात रवींद्र कोळी, किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. शिबिरात गाठींचे प्रकार, बांधणीचे प्रकार, प्रथमोपचार प्रात्यक्षिके, स्ट्रेचर बनविणे, बिन भांड्यांचा स्वयंपाक, बीपी व्यायाम प्रकार, सर्वधर्म प्रार्थना, आदी अभ्यासक्रमावर आधारित प्रात्यक्षिकांचे उपयोजन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. शिबिराचा समारोप बक्षीस समारंभाने करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष बंडू काळे, मुख्याध्यापक विलास नारखेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. त्यात उत्कृष्ट संघनायक विघ्नेश दीपक लोहार, उत्कृष्ट संघनायिका तेजस्वी विनोद जगताप, आदर्श स्काऊट हर्षल केशव पाथरवट, आदर्श गाईड शिवानी गणेश गोसावी, ध्वज लीडर विनय निवतकर, ध्वज दल खुशी सोनवणे, रोशनी राठोड, मीनल महाले यांना वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट तंबू सजावट व उत्कृष्ट स्वयंपाक यासाठी सांघिक पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात आली. याबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष बंडू काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी स्काऊट मास्टर राजेश वाणी, दिनेश चौधरी, गाईड कॅप्टन स्वाती कोल्हे, प्रतिभा राणे तसेच विद्यालयातील शिक्षक संतोष पाटील, सीमा चौधरी, विशाल पाटील, जगदीश नेहते, महेंद्र पाटील, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
