जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी :
शहरातील नवीन बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे महागडे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी निखिल राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव) आणि मयूर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) हे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानक आवारात असतांना अज्ञात चोरट्यांनी दोघांचे महागडे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला.
परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर त्यांनी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे करीत आहे.
