विद्यार्थ्यांनी प्राचिन नाणी, वस्तू विनिमय पद्धती, प्राचिन वास्तूंच्या प्रतिकृती यांची माहिती घेतली.
साईमत/यावल /प्रतिनिधी :
येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची हिवाळी शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी चंदनपुरी, चांदवड, नाणे संग्रहालय (नाशिक), दादासाहेब फाळके स्मारक, पंचवटी, पांडवलेणी, स्वामिनारायण मंदिर तसेच काळाराम मंदिर या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
नाशिक येथील नाणे संग्रहालयात विद्यार्थ्यांनी प्राचिन नाणी, वस्तू विनिमय पद्धती, प्राचिन वास्तूंच्या प्रतिकृती यांची माहिती घेतली. तसेच विविध प्रकारचे जीवाश्म व समुद्री जीवाश्म यांविषयी सविस्तर ज्ञान मिळविले. स्वामिनारायण मंदिरातील सुबक कोरीव काम व स्थापत्यशैलीने विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पंचवटी, पांडवलेणी व काळाराम मंदिर येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सहलीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले असून सर्व विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला. सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.गर्गे यांच्यासह एल.व्ही.चौधरी, एन.ए.बारी, एस.डी. देशमुख, के.एम. लोंढे, अंजली कवडीवाले, एम.एस.अट्रावलकर, दीपक सपकाळे व सुनील सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
