सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना लावले रिफ्लेक्टर
साईमत/पारोळा /प्रतिनिधी
दाट धुके, थंडीची लाट आणि सतत खराब होणारे हवामान लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव युनिटतर्फे रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.टोल संकलन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक भूषण सुरेश बागूल, उपव्यवस्थापक सचिन श्रीधर दळवी यांच्या उपस्थितीत सबगव्हाण टोल
प्लाझावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. ही मोहीम साधारणतः एक ते दोन आठवडे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
