दिनदर्शिकेत हिंदू धर्मातील पवित्र सणांच्या माहितीचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेच्यावतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिका तयार करण्यात येते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असतो. २०२६ साठी बँकेच्यावतीने वैदिक सणांचे शास्त्रीय व आध्यात्मिक महत्व या विषयास अनुसरुन हिंदू धर्मातील पवित्र सणांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत केला आहे.
याप्रसंगी श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, संत मुक्ताबाई संस्थानचे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, वैद्य डॉ. प्रणिता वडोदकर, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष डॉ.अतुल सरोदे, संचालक अनिल राव, हरीशचंद्र यादव, जयंतीलाल सुराणा, सीए नितीन झवर, हिरालाल सोनवणे, मधुकर पाटील, संचालिका डॉ.आरती हुजूरबाजार, संध्या देशमुख, क्षुधाशांती सेवा संस्थाचे प्रकल्प प्रमुख संजय बिर्ला, व्यवस्थापन मंडळ सदस्य मोहन रावतोळे, ॲड.निखील कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल तसेच केशव स्मृती सेवा संस्था समूहासह बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
