२८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला बुधवारी दुपारी आपल्या घरी असताना संशयित आरोपी अक्षय पांडूरंग मिस्तरी (वय २५, रा. पिंप्राळा) याने तिचा हात पकडून तिला घरात ओढले. त्यानंतर अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर धक्का बसलेल्या महिलेने तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय मिस्तरी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करीत आहेत.
