संशोधनातील नावीन्य, गुणवत्ता, प्रगतीची दमदार झेप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धरणगावातील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धा (फेज-१) मध्ये मू. जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण, संशोधनावर आधारित आणि उत्कृष्ट सादरीकरण करून भव्य यश संपादन केले आहे. विविध विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव संकल्पनांना परीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळून महाविद्यालयाने प्रभावी उपस्थिती दर्शवली आहे. यावर्षी महाविद्यालयाकडून २६ प्रकल्प सादर केले. त्यात पदवीधर १४, पदव्युत्तर २, पीएच.डी.६ व व्हीसीआरएमएस संशोधक, प्राध्यापक ४, असे ४० सहभाग (पुरुष १८, महिला २०) नोंदविण्यात आले. त्यापैकी अनेक प्रकल्पांनी उत्तुंग यश मिळवत विभागनिहाय उल्लेखनीय कामगिरी प्रदर्शित केली.
पदवीधर स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये कुमुदिनी देव नारायण झा (मूलभूत विज्ञान), प्रणिता उमेश धनगर व राजेश सुरेश प्रजापत (मूलभूत विज्ञान), प्रथमेश एम. खेवळकर, साक्षली व्ही. मुंडके (वैद्यकीय शास्त्र व औषधनिर्माण शास्त्र), सारा शरीफ पटेल (कृषि विज्ञान आणि पशु संवर्धन शास्त्र), गुंजाळ सानिका मंगळ, वैशाली प्रभाकर पाटील (मूलभूत विज्ञान), सुमित आर. पाटील, सौरव आर. डोके (मूलभूत विज्ञान), पदव्युत्तर स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये पल्लवी ईश्वर पाटील, सिद्धी विनोद दुसाने (मूलभूत विज्ञान), मनस्वी एस. पाटील, हितेश पी. राजपूत (कृषि विज्ञान आणि पशु संवर्धन शास्त्र), पीएच.डी. (Ph.D.) विभागातील विजयी संशोधकांमध्ये ज्योती बाबुलाल भोई (कृषि विज्ञान आणि पशु संवर्धन शास्त्र), अतुल राजेंद्र पाटील (कृषि विज्ञान आणि पशु संवर्धन शास्त्र) असे १६ विद्यार्थी विद्यापीठस्तरासाठी (फेज-२) निवडले गेले आहे. त्यात ८ गट पोस्टर सादरीकरणासाठी आणि २ गट मॉडेल सादरीकरणासाठी निवड झाले आहेत.
डॉ. किशोर पाटील, प्रा. देवीश्री सोनवणे यांनी अविष्कारसाठी संघ समन्वयक म्हूणन काम बघितले. आविष्कार स्पर्धेत सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो, समस्या सोडवण्याची क्षमता वाढते आणि आत्मविश्वास अधिक दृढ होतो. हाच दृष्टीकोन समोर ठेवून मू. जे. महाविद्यालयाचे बडींग रिसर्च व अविष्कार समितीचे चेअरमन डॉ. विशाल भारुड यांच्या व टीमचा उत्साहवर्धनातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वैज्ञानिक जिज्ञासा तयार करणे व संशोधन बद्दल गोडी लावणे यावर भर देत आहे. यामध्ये मू. जे महाविद्यालयाचे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. झेड. चोपडा यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले तर प्राचार्य स.ना. भारंबे यांनी संशोधनासाठी विद्यार्थ्यांना सतत प्रेरित केले. केसीई सोसायटी व महाविद्यालय बडींग रिसर्चसाठी सतत प्रोत्साहन करतात.
