विविध स्पर्धा, मोठी विद्यार्थी सहभागिता; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
साईमत/पारोळा/प्रतिनिधी/
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील बाहुटे येथील ग्लोबल मिशन स्कूलमध्ये आयोजित क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.महोत्सवाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी पारोळा पोलिस उपनिरीक्षक विजय भोंबे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोहर पाटील, अरुण पाटील, यशवंत पाटील, अजय पाटील, राजेंद्र शर्मा उपस्थित होते. मशाल प्रज्वलनानंतर क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात झाली. प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी लिंबू-चमचा, चेंडू शर्यत, धाव शर्यत तर ४ थी ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १०० मीटर धाव, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, संगीत खुर्ची, झिगझॅग धाव, गोळाफेक, जलतरण अशा विविध संघनिहाय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना पीएसआय विजय भोंबे म्हणाले, खेळ केवळ मनोरंजन नसून जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी खेळ अत्यावश्यक आहेत.
संस्थापक अध्यक्ष मनोहर पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. क्रीडा महोत्सवाचे नियोजन व आयोजन प्राचार्य उमाकांत बुंदिले आणि उपप्राचार्य उज्वला पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी पाटील व विकास झा यांनी केले तर आभार राजेंद्र शर्मा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी एस.जे.पाटील, राहुल के., जयेश पाटील, नोबेल जॉय, गिरीधारी गरुड, क्रीडा शिक्षक धनराज मोरे, संगीत शिक्षक अनिल सूर्यवंशी, भावेश पाटील, मोहन पाटील, तुषार पाटील, रीता पाटील, सोनाली माळी, वैष्णवी पाटील, आरती चौधरी, वैशाली महाजन, सरला पाटील, निकिता पाटील, करिष्मा सोनवणे, दीपाली पाटील, सोनल पाटील, प्रियांका पाटील आदींनी परिश्रम घेतले.
