डेमला कॉलनीत भाविकांची दर्शनासाठी गर्दी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथील डेंमला कॉलनी येथे श्री साईबाबा मंदिराचा १३ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यानिमित्त सकाळी आरतीसह महाप्रसादाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सुरुवातीला साईबाबांचे नामस्मरण आणि भजन भाविकांनी मोठ्या उत्साहाने म्हटले. साई नामस्मरण, आरती व प्रसादरूपी सेवेमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
वर्धापनदिनात चेतन दिलीप तिवारी आणि दीपाली चेतन तिवारी आणि परिवार डेंमला कॉलनी यांच्या हस्ते अभिषेक झाला. सोहळ्यासाठी शहराचे आ. सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी विशेष सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेवक दीपमाला काळे, मनोज काळे, भास्कर पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील, चेतन तिवारी यांचे सहकार्य लाभले.
आयोजक श्री साईबाबा मंदिर समितीतर्फे सर्व मान्यवर व भाविकांचे आभार मानण्यात आले. भक्तांच्या उपस्थिती व सहकार्यामुळे हा वर्धापनदिन सोहळा अत्यंत भक्तीभावाने पार पडला. यावेळी माजी मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, सरचिटणीस चेतन तिवारी, महिला मंडळचे डॉ. जुही भोळे, ललिता बाहेती, दीपाली तिवारी, आरती बांगर, अंकिता पाटील, दीप्ती चिरमाडे, अंजली देशपांडे यांच्यासह महिला, प्रभागातील सर्व नागरिक, भाविक उपस्थित होते.
