१४ डिसेंबरला वधू-वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळाव्याचे कलश व मंडप भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. हा मेळावा येत्या रविवारी, १४ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात आयोजित केला असून तयारीला सुरुवात झाली आहे. भूमिपूजनाचा हा प्रारंभ शांताराम चौधरी यांच्या हस्ते विधीवत करण्यात आला. यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, सचिव अनिल पाटील तसेच कार्याध्यक्ष विनोद चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीमुळे भूमिपूजन सोहळ्याला विशेष उत्साह लाभला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात तयारी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमस्थळी सिताराम देवरे, एम. चौधरी, डॉ. अर्जुन चौधरी, अनिल चौधरी, संजय चौधरी, मधुकर देवरे, आनंदा चौधरी, दशरथ चौधरी, सचिन चौधरी, व्ही. आर. पाटील, जे. बी. चौधरी, अशोक चौधरी, संजय पांडुरंग चौधरी, सुभाष चौधरी, नामदेव चौधरी, अर्जुन चौधरी, सुरेश चौधरी, मेघश्याम चौधरी, राहुल चौधरी, दीपक चौधरी, भानुदास चौधरी, दिलीप चौधरी, मांगो चौधरी, निलेश चौधरी, सुरेश चौधरी, प्रशांत चौधरी, मयूर ठाकरे, विनोद चौधरी, योगराज चौधरी, कैलास चौधरी, भगवान चौधरी, जितेंद्र चौधरी, किरण चौधरी, लोकेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
