माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजीत उपक्रम
साईमत/ चोपडा/प्रतिनिधी :
तालुक्यातील हातेड बु, हातेड खु. व गलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना घरुन शुध्द व थंड पिण्याचे पाणी आणता यावे याकरिता पाण्याच्या बाटल्या वितरीत करण्यात आल्या. सदर उपक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आला होता.
याप्रसंगी सर्वप्रथम महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पाजंली अर्पण करण्यात आली. तसेच रंगोत्सव ह्या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळावी ह्या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवरच्या आयोजित स्पर्धेत यश प्राप्त विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र तसेच शाळेस मिळालेल्या चषक प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पाटील, सुतगिरणीचे संचालक देविदास सोनवणे, चोपडा तालुका पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग वंजी सोनवणे, हातेड सरपंच संदिप सोनवणे, सुतगिरणी संचालक चंद्रकांत पाटील, शेतकी संघ संचालक प्रभाकर सोनवणे, सुनिल बाविस्कर, उपसरपंच राम सनेर, बाळु पावनकर, सतिष सोनवणे, निलेश भाऊ, सोमनाथ भिल्ल, मुकेश पाटील, दिपक भाऊ घुमावल, अतुल सोनवणे, विकी सोनवणे, अजय सोनवणे, निलेश सनेर आदींसह मुख्याध्यापक श्री. बोरसे इतर शिक्षकवृंद उपस्थित होते
