Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न – संजय राऊत
    राज्य

    अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न – संजय राऊत

    saimat teamBy saimat teamOctober 25, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचे वैभव आहे. एनसीबीच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावी अशा प्रकारचे प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. राज्य सरकारने या सर्व प्रकरणांची स्युमोटो दखल घेत विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

    एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर, संजय राऊत यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. तो खरा असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आज समोर आलेले दोन दोन व्हिडीओ बोलके आहेत. लपवाछपवी करण्याची गरज नाही. या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र सरकारने चौकशी करायला हवी. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात, राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

    सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार मुंबई महाराष्ट्रात फारच कामाला लागल्याचे सांगून राऊत म्हणाले की, या राज्याचे लोक अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरू आहे. मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. मलिक यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली असून, राज्य सरकारने विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.