विद्यार्थ्यांनी नृत्यांचे सादरीकरण करून जिंकली उपस्थितांची मने
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रबोधन संस्था संचालित मातोश्री प्राथमिक विद्यालयात माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निसर्गकन्या तथा ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सुरुवातीला बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन शारदा मोहिते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या ओव्या, कविता, भाषण तसेच त्यांच्या कवितांवर आधारित नृत्यांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमोद झलवार यांनी विद्यार्थ्यांसाठी बहिणाबाईंच्या साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केली होती.
कार्यक्रमात प्रियांका सोळंके, हेतल, सेजल, उन्नती, पूजा, तन्वी, प्रांजल सोनवणे, स्वरा राठोड, तेजस कापडे, ध्रुव पाटील, समर शिरसाळे, लाजर बाविस्कर, सना तडवी, आरती पवार, हेमांगी सोनवणे, कुणाल राठोड, ज्ञानेश्वर देवराज, देविका बाविस्कर, तनु सोनवणे, आदिती वानखेडे, तेजश्री बाविस्कर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक समाधान इंगळे यांच्या सुचनेनुसार संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी वैशाली पाटील यांनी केली. सर्व शिक्षकांनी उत्साहाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील अनुजा कोळी हिने केले.
