उपक्रमात विविध शाळेतील विजेत्या गटांना प्रमाणपत्रासह बक्षीस
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी ज्ञान वाढवून तसेच युवक, शालेय विद्यार्थी यांच्या गटांनी चांगले कार्य करण्याची सवय लागणे, यासाठी पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्टतर्फे संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण झाली, असे सचिव रघुनाथ राणे सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला वाव मिळून पोस्टर स्पर्धेतून संविधानाबाबत ज्ञान वाढून संदेश पोहोचविण्यात आला. संविधान प्रश्नमंजुषा उपक्रमात विविध शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विजेत्या गटांना प्रमाणपत्रासह बक्षीस देण्यात आले. लहान गटात प्रथम रेहान तडवी, भावना जाधव, भैरवी निवतकर, भावेश भालेराव, मोठ्या गटात खुशी सोनवणे, दिसू सपकाळे, जीवन कोळी, निलेश पावरा, उत्तेजनार्थात श्रद्धा वडनेरे, कामरान तडवी, प्रतीक मोरे यांचा समावेश होता.
संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करण्यास प्रोत्साहित करणे हे उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास नारखेडे, ॲड. सलीम शेख, पवन नारखेडे, डॉ. हरीश सोनार, सचिन मुळे, लीलाधर नारखेडे, सुधाकर सबके, राहुल माळी, रोहित बारी, राजेश वाणी आदींनी सांगितले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
