फैजपूर, प्रतिनिधी । सीमेवर सैनिक थांबून देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकणार नाही. आणि चांगले कार्य जगात भरपूर आहे पण हे चांगले कार्य प्रत्येक मनुष्य करु शकत नाही. सीमेवर थांबून देशाची सेवा करण्याचे कार्य प्रत्येकालाच आवडत असते पण प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन सेवा करू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक सैनिकाचे कौतुक करणे समाजाचे कर्तव्य आहे.
त्यांना मदत रुप होणे हे आपले कर्तव्यच असून त्यांचे आई-वडील, धर्मपत्नी यांचेही आपण धन्यवाद मानायला पाहिजे. त्यांनी आपल्या मुलाला, पतिला केलेल्या सहकार्यामुळेच तो सीमेवर थांबून देशाचे रक्षण करू शकला. आणि प्रत्येक भारतीय आपल्या घरी शांततेत जीवन जगू शकला.सैनिक प्रत्यक्ष युद्धात सहभागी होत असतात अशा सैनिकांना, पोलिसांना समाजाने कर्तव्य समजून मदत रूपी सहकार्य करावे असे प्रतिपादन सावद्याच्या स्वामीनारायण गुरुकुल चे खजिनदार शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांनी केले.
कोजागिरीच्या दिवशी कोरपावली येथील श्री स्वामी नारायण मंदिरा मध्ये सेवानिवृत्त सैनिक नायक महेंद्र पंडित पाटील सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व श्रीफळ, शाल देऊन भक्तीस्वरूपदासजी यांच्या हस्ते सत्कार केला. त्यानंतर शास्त्री भक्तीस्वरूपदासजी शरद पौर्णिमेची महती सांगताना म्हणाले की, शरद पौर्णिमेच्या दिवशी मनात जे भाव असतात ते पूर्ण करण्यासाठी शरद पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्ण यांनी रासोत्सवाचे आयोजन केले होते . शरद पौर्णिमेच्या दिवशी रास उत्सव घडला होता.गोपिकांचे भाव पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी आजच्या दिवशी जेवढ्या गोपिका होत्या तेवढी रूपे घेऊन त्या गोपिकांचे मनसंकल्प पूर्ण केले होते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम स्वामीनारायण संप्रदायामध्ये सुरू आहे.स्वामीनारायण भगवंतांनी पंचाळा या गावाला संत व हरिभक्त यांच्यासोबत रास खेळून त्यांच्या संख्येइतकी स्वरूप धारण करून त्यांच्या समवेत रास खेळला व सर्वांना तसे दर्शन दिले. एवढा महिमा उत्सवाबद्दल शास्त्री भक्तीस्वरूपदासजी यांनी सांगितला. याप्रसंगी स्वामी लक्ष्मी नारायण, स्वामी सत्यप्रकाश, वेदांत भगत, मंदिराचे कोठारी सुकलाल नेहेते गुरुजी, राकेश फेगडे, ग्रामस्थ व हरिभक्त भाविक उपस्थित होते . शेवटी कोजागिरीचा प्रसाद दुग्ध प्राशन करून कार्यक्रम संपला.
