
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उपक्रम
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
येथील बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उपक्रमांतून जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा व शिक्षकांनी आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, पूजनाने मानवंदना दिली.आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती, सण,कला कौशल्य व वारली पेंटिंग,आदिवासी नृत्य
इत्यादी सर्व बाबींची माहिती गोळा करून त्या मंचावर सादर केल्या.वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचा गोडवा, भाषा,त्यांचे दैनंदिन जीवन,निसर्गाशी असलेले प्रेम व नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.महिला शिक्षकांनी ही आदिवासी नृत्यात सहभाग दर्शवून कार्यक्रमाची रंगत वाढविली.


