
प्राथमिक व माध्यमिक शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
म्हसावद येथील ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख म्हणून संस्थेचे चेअरमन पंकजराव साळुंखे उपस्थित होते.
यावेळी पंकजराव साळुंखे व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका दिपाली पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमची शोभा द्विगुणीत केली. यावेळी सुनील तापीराम बारेला यांनी विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्याबद्दल अधिक माहिती विषद करून त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमशील शिक्षक एन.डी.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.


