NCP In Jalgaon : जळगावात रा.काँ.शरद पवार गटातर्फे तणनाशक शिंपडून प्रतीकात्मक आंदोलन

0
3

आकाशवाणी चौकातील सर्कलसह परिसरात पसरली अस्वच्छता

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असून परिसरात कचरा साचत असल्याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. सर्कल मोडकळीस आलेले असताना आणि परिसराची नियमित स्वच्छता न ठेवता झालेल्या निष्काळजीपणाबद्दल आंदोलनकर्त्यांनी जळगाव महानगरपालिका तसेच नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनात सर्कलमध्ये उगवलेल्या गवतावर पंपाच्या सहाय्याने तणनाशक रसायनाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील साचलेला कचरा गोळा करून एका बाजूला हलवण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परिसराची साफसफाई नेहमीप्रमाणे ठेवण्यात यावी आणि भविष्यात गवताची वाढ रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली.आंदोलनकर्त्यांनी इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौकातील सर्कलचीही स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्या ठिकाणांवरही तत्काळ स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीचे उपाय करावेत, असे आवाहन प्रशासनाला केले.

आंदोलनात शहराध्यक्ष इजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, माजी अध्यक्ष अशोक लाडवांजारी, सचिव सुनील माळी, युवक अध्यक्ष निको चौधरी, विद्यार्थी अध्यक्ष गौरव वाणी, उपाध्यक्ष किरण राजपूत, कलाबाई शिरसाट, माजी नगरसेवक राजीव मोरे, दुर्गेश पाटील, रहीम तडवी, मतीन सय्यद, गौरव डांगे, अखिल पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here