Manse Distributed ‘Anandacha Shidha’ : हरीविठ्ठल नगरात मनसेतर्फे गरजूंसाठी ‘आनंदाचा शिधा’चे वाटप

0
4

२१ रुपये किलो दराने साखर, महिलांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

दिवाळीचा उत्साह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हरीविठ्ठल नगरातील शाखेत ‘आनंदाचा शिधा’चा उपक्रम राबविला. उपक्रमातंर्गंत गरजू कुटुंबांना फक्त २१ रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्यात आली. हा उपक्रम शहरातील हरी विठ्ठल नगरातील वार्ड क्रमांक ११ मध्ये मनसे महिला शाखेच्यावतीने आयोजित केला होता. साखर वितरणावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. यावेळी ४०० किलो साखरचे वाटप करण्यात आले.

सरकारने आम्हाला आनंदाचा शिधा दिला नाही. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आनंदाचा शिधा मिळाल्याचे उपस्थित काही महिलांनी नमूद केले. कार्यक्रमास महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भील, सागर शिंपी, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, दीपक राठोड, विकास पाथरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

साखर वाटपमुळे गरजूंची दिवाळी गोड

शासनाने ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती. परंतु ऐन दिवाळीत योजनेचा लाभ न मिळाल्याने गरजूंच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम सरकारने केले आहे. अशा आनंदावर पडलेले विरजण दूर करण्यासाठी आणि हरिविठ्ठल नगरातील गरजूंची दिवाळी गोड करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केवळ २१ रुपये दराने ४०० किलो साखरचे वाटप केल्याचे मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here