Akash Mandore Joins BJP : आकाश मंडोरे यांचा भाजपात प्रवेश : आ. भोळे यांच्या उपस्थितीत स्वागत

0
11

आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद अधिक वाढणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश वाढत आहे. त्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होत आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी आकाश मंडोरे यांनी भाजपात प्रवेश करून पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. प्रवेश सोहळ्यावेळी आ. राजुमामा भोळे यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपात नव्या कार्यकर्त्यांचा होत असलेला सहभाग पाहता, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद अधिक वाढणार असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here