‘MNS’ Blows The Election : ‘मनसे’कडून निवडणुकीचा शंखनाद : जनतेचा वाढला विश्वास

0
3

उमेदवारांच्या चाचपणीला प्रतिसाद, १९ वार्डांत उमेदवार देणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरपालिकेच्या रणसज्जतेला जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या उमेदवार चाचपणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ही बैठक आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व १९ प्रभागांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मनसेच्या जळगाव शहर शाखेतर्फे घेण्यात आली. ही बैठक पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी शहरातील पद्मालय विश्रामृहात पार पडली. बैठकीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केले.

जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलचा जनतेचा विश्वास वाढत आहे. शहरातील अनेक प्रभागातील नागरिक आणि अन्य पक्षांचे संभाव्य उमेदवार मनसेच्या संपर्कात आहेत. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून सातत्याने लढा देणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसे सर्व १९ वार्डांमध्ये उमेदवार देणार आहे, जनतेच्या पाठिंब्याने ही निवडणूक ताकदीने लढवली जाईल, असे ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले.

बैठकीत महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी वार्डरचना आणि मतदार यादीविषयी माहिती दिली. तसेच माजी महानगराध्यक्ष किरण तळले यांनी आगामी निवडणूक रणनितीवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, राहुल चव्हाण, दीपक राठोड, पवन सपकाळे, ऐश्वर्या श्रीरामे, भूषण ठाकूर, ॲड. सागर शिंपी, खुशाल ठाकूर आदींची उपस्थिती होती.

मनसेच्या रणसज्जतेला शहरात सकारात्मक वातावरण

महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील, अनिता बोरसे, ज्योती खुरपुडे, शुभांगी कावळे, लता पाथरवट यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग नोंदवला. बैठकीत आगामी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्राथमिक चाचपणी करण्यात आली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मनसेच्या रणसज्जतेला शहरात सकारात्मक वातावरण मिळत असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here