“फटाके फोडणे टाळा प्रदूषणाला घाला आळा” विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात दिवाळीत फटाक्यांनी प्रदूषण होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांकडून म्हणून प्रतिज्ञा घेतली. भगवान नगर, भूषण कॉलनी परिसरातून पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी “फटाके फोडणे टाळा प्रदूषणाला घाला आळा” अशा प्रकारच्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे, समन्वयक प्रतिभा खडके, सीमा चौधरी, डॉ.प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, संतोष पाटील, विशाल पाटील, राजेश वाणी, दिनेश चौधरी, अजय कुवर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.