Leather Workers’ Community : जळगावात चर्मकार समाजाचा २ नोव्हेंबरला निःशुल्क तृतीय आंतर राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

0
11

व्यासपीठावर विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी सरळ परिचय, पालकांसाठी सुलभ संधी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाच्यावतीने समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी तृतीय आंतर राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे होणार आहे. मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ना.संजय सावकारे, खा.श्रीमती स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित राहतील. यावेळी विवाहेच्छुक उपवर-वधू, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचे रंगीत छायाचित्रांसह सविस्तर परिचयपत्र पाठविण्याची अंतिम मुदत बुधवारी, २० ऑक्टोबर आहे.

मेळाव्यासाठी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये (कंसात मो.क्र.) प्रदेश सदस्य संजय वानखेडे (८६२५९६५२४१), राज्य संघटक डॉ. संजय भटकर (९९२३००५२७६), प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ सावकारे (९५९५३०४०४४), ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव नेटके (९४२२७८४३७०), प्रदेश सहसचिव ॲड. चेतन तायडे (८६६९०५६३४४), नाशिक विभागीय अध्यक्ष मनोज सोनवणे (९७९०५६३१६६), जिल्हाध्यक्ष ॲड. अर्जुन भारुळे (८४२१५६९४४४), विभागीय उपाध्यक्ष देविदास मोरे (९४२१६१०४४५), जिल्हा सचिव प्रा. धनराज भारूडे (९४०५६२६३३२), ज्येष्ठ सल्लागार डॉ. कडू भोळे (९८९०१६११०१), जिल्हा कार्याध्यक्ष सरपंच राजेश वाडेकर (९४२०३८८६९७), महानगराध्यक्ष कमलाकर ठोसर, जिल्हा उपाध्यक्ष पंकज तायडे, प्रकाश रोजतकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मेळाव्यात विवाहेच्छुक युवक-युवतींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून व्यासपीठावर आपला परिचय सादर करण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्यावतीने केले आहे. त्यामुळे समाजातील युवक-युवतींना योग्य विवाहस्थळ उपलब्ध करून देण्यास मदत होऊन पालकांचा वेळ, श्रम व खर्च वाचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here