लिटरसी, न्यूमरसीसह गणित, विज्ञान, संगणक विषयांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेमनगरातील ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ कालावधीत ॲक्टिव्हिटी प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर उत्साहपूर्वक आणि आत्मविश्वासाने शैक्षणिक सादरीकरण केले. इयत्ता नर्सरी ते के.जी. वन गटातील विद्यार्थ्यांनी लिटरसी व न्यूमरसी विषयांवर सादरीकरण केले तर इयत्ता पहिली ते आठवीच्या गटातील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि संगणक विषयांवर प्रेझेंटेशन सादर केले.
अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून मिळवलेल्या ज्ञान आणि कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन पालकांसमोर केले. पालकांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे उत्तम कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी आणि उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.