Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘Go-Green’ Scheme Of The Electricity : वीज महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेकडे ग्राहकांचा कल
    जळगाव

    ‘Go-Green’ Scheme Of The Electricity : वीज महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेकडे ग्राहकांचा कल

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गेल्या ३ महिन्यात २ लाखांवर ग्राहक सहभागी ; पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा वार्षिक फायदा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर कमी करण्यासाठी वीज महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख तीन हजार ३४० ग्राहकांनी योजनेत सहभाग घेतला आहे. वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत, केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’ द्वारे बिल पाठविण्याचा पर्याय निवडून सोमवारी, ६ ऑक्टोबरपर्यंत सात लाख हजार ९२४ पर्यावरणस्नेही ग्राहक योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना ८ कोटी ४८ लाख ३० हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.

    गो-ग्रीन योजनेतील ग्राहकांचा वाढता सहभाग स्वागतार्ह आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी योजनेत सहभागी व्हावे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यात (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) दोन लाख तीन हजार ३४० ग्राहकांनी योजनेत भर पडली आहे. त्यात पुणे प्रादेशिक विभागात ८७ हजार ४० ग्राहक, कोकण प्रादेशिक विभागात ७८ हजार ८२९ ग्राहकांचा समावेश आहे. योजनेत आतापर्यंत सात लाख सहा हजार ९२४ सहभागी ग्राहकांना वार्षिक फायदा झाला आहे. पुणे दोन लाख ८८ हजार २३८ ग्राहकांना ३.४६ कोटी रुपये, कोकण दोन लाख ६२ हजार २३७ ग्राहकांना ३.१५ कोटी रुपये, नागपूर ८४ हजार ५३१ ग्राहकांना १.१ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर ७१ हजार ९१८ ग्राहकांना ८६ लाख ३० हजार रुपये फायदा झाला आहे.

    योजनेत सहभागी कसे व्हाल…!

    वीज महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट किंवा मोबाईल ॲपवर स्वतंत्र नोंदणी करता येते. केवळ ग्राहक क्रमांक सबमिट करून छापील बिल रद्द करता येईल, आणि संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व ई-मेलवर दरमहा बिल पाठवले जाईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा ई-मेल बदलण्याची सोय उपलब्ध आहे.

    वार्षिक १२० रुपये फायदा

    ‘गो-ग्रीन’ पर्याय निवडल्यास प्रत्येक बिलावर १० रुपये सवलत मिळते. म्हणजे वार्षिक १२० रुपये ग्राहकांच्या फायद्यात भर पडते. त्यामध्ये पहिल्या बिलामध्येच पुढील १२ महिन्यांची सवलत लागू केली जाते.

    गो-ग्रीन योजनेचे अतिरिक्त फायदे

    नोंदणीकृत ई-मेल, मोबाईलवर दरमहा वीजबिल पाठवले जाते.बिलाची रक्कम सात दिवसात भरल्यास १ टक्के अतिरिक्त सवलत. बिल संगणक किंवा मोबाईलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे कधीही डाऊनलोड किंवा रंगीत प्रिंट घेता येतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : तिकीट नाकारल्याने भावनिक क्षण; कुटुंबाला रडू कोसळले, आमदार हतबल

    December 30, 2025

    Jalgaon:अवैध गांजाची साठवणूक करणाऱ्याला संशयिताला अटक

    December 29, 2025

    Jalgaon:शेठ ला.ना.सार्व.विद्यालयात किशोर महोत्सवाचा बक्षीस वितरणाने समारोप

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.