साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे नवरात्र उत्सवानिमित्त दोन दिवसीय गरबा स्पर्धेने धुम उडवत एफवायबीकॉमच्या वर्गातील नेहा सुनील सपकाळे हिने ‘गरबा क्वीन’चा मान पटकाविला. टीवायबीएस्सीच्या वर्गातील तन्वी नंदकिशोर महाजन हिला ‘बेस्ट परफॉर्मन्स’ तर टीवायबीकॉमच्या वर्गातील दिक्षा नारायणराव शिंदे हिला ‘बेस्ट कॉस्च्युम’ पारितोषिक मिळाले. तसेच टीवायबीए वर्गातील दीपाली विनोद सोनी, एसवायबीकॉमच्या वर्गातील तृप्ती भरत सोनार यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
महाविद्यालयात नवरात्र उत्सवानिमित्त कला व संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी ‘गरबा प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित केली होती. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींसाठी कला मंडळातर्फे ‘गरबा स्पर्धा’ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे शहरातील एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील होते. सायंकाळी सहा वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. विविध फेऱ्यांमधून विद्यार्थिनींनी आपल्या नृत्यकौशल्याचा अप्रतिम आविष्कार सादर केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही.जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.
गरबा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाचे आयोजन कला मंडळाच्या प्रमुख प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, डॉ. सत्यजित साळवे, सुनीता पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. डॉ. स्मिता चौधरी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी प्रा. रंजना पाटील, प्रा. शितल चौधरी, प्रा. अमृता नेतकर, प्रा. राणी त्रिपाठी, प्रा. मिताली अहिरे, प्रा. शांताराम तायडे, प्रा. मंगेश किनगे, प्रा. कल्पना खेडकर, वसतिगृह अधिक्षिका कामिनी धांडे तसेच कला मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गरबा स्पर्धेला विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे परीक्षण छाया पाटील आणि डॉली आनंदकुमार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिता कोल्हे यांनी केले.