14 Lakh From Jewellers : ज्वेलर्समधील १४ लाखांचे सोने चोरून बंगाली कारागीर फरार

0
23

जळगावातील बालाजीपेठेत घडली घटना

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

सोन्याचे दागिने घडविणाऱ्या एका कारागीराने ज्वेलरीमधून सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोने लुटले. ही घटना शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स येथे उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बिस्वजीत बनेस्वर सासमल (सोने कारागीर, ह.मु. रिधुरवाडा, मूळ रा. वार्ड नं. १० जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. ३ लाख ७२ हजार किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचा एक तुकडा, ५ लाख १८ हजार किमतीचे अंदाजे ४७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख ९८ हजार किमतीचे अंदाजे २७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख १० हजार किमतीचे अंदाजे १९ ग्रॅम वजनाची २२ कॅरेटची सोन्याची लगड असा सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संशयिताने लंपास केला. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here