एकता फाउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंह यांच्या जयंतीनिमित्त एकता फाउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे जळगावातील कायदेतज्ञ, गो-सेवाव्रती तथा पर्यावरण मित्र ॲड. विजय सूरजमल काबरा यांना ‘डॉ. मनमोहन सिंह राष्ट्रीय गौरव पुरस्काराने’ नुकतेच सन्मानित करण्यात आले.
गेल्या २००९ पासून ॲड. विजय काबरा “सामूहिक गो-सेवा एक अनुष्ठान” मोहिमेअंतर्गत राज्यातील हजारो लोकांनी देशी गो-मातांची सेवा करत आहे. तसेच मागील काळात ३७ तृतीयपंथीयांनीही गो-सेवा केली.जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश, वकील, डॉक्टर्स, सनदी लेखापाल, इंजिनिअर, शिक्षक व सर्व व्यवसायिकांनी गो-सेवा केली. प्रामुख्याने दै.‘तरूण भारत’ आणि जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे दरवर्षी गो-सेवा करण्यात येते. जळगाव शहरातील रोजी-रोटीसाठी झगडणाऱ्या रिक्षा चालक व मालक हिंदू, मुस्लिम बांधवांनी सोबत येवून गो-सेवा केली.
पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन
गेल्या १९९४ पासून नोंदणीकृत असलेल्या “पृथ्वी बचाव” संस्थेचे ते संस्थापक-अध्यक्ष आहेत. शासनाकडून कोणतेही अनुदान न घेता लोकांनी लोकांसाठी लोकांकडून कोणतेही आर्थिक सहाय्य न घेता सेवेच्या उद्देशाने पर्यावरण संरक्षण व वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत आहे. गेल्या काळात वन्यजीवांचे त्यात प्रामुख्याने मोर, सांबर, हरीण, कासव यांचे संरक्षणासाठी व त्यांच्या हत्या रोखण्यासाठी त्यांच्या संस्थेने आवाज उठविला होता. अवैध कामांना प्रतिबंध घातला होता. त्याची दखल घेवून तत्कालीन जिल्हा वनसंरक्षक श्री.पोले, श्री.रविचंदन यांनी ॲड.काबरा यांच्या कार्याचा गौरव केला होता. अशातच त्यांच्या कार्याची दखल घेत ॲड. विजय काबरा यांना डॉ. मनमोहनसिंह राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.