Mehrun Ravan Dahan : मेहरुण तलावावर आकाशात फटाक्यांची आतषबाजीसह उत्सव समितीतर्फे रावणदहन

0
14

फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीने उपस्थितांचे वेधले लक्ष

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

नवरात्रीची सांगता होताच गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात रावणदहन उत्सव समितीतर्फे पारंपरिक रितीने रावणदहन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी फटाक्यांच्या रोषणाईने परिसर दुमदुमला तर मान्यवरांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन, नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्यासह पोलीस अधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रावणाचे दहन होताच उपस्थित नागरिकांनी जल्लोष केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणदहन सोहळ्याचे आयोजन समितीतर्फे भव्य स्वरूपात केले होते. सायंकाळी झालेल्या फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सोबतच शहरात दसरा उत्साहात साजरा झाला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here