दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्याप्रतीच्या कृतज्ञतेसाठी ‘अश्वपूजन’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
हिंदू धर्मातील ‘भूतदया’ ही शिकवण किंवा विचाराने प्रेरित होऊन घोड्यांबद्दलची करुणा आणि कृतज्ञता समाजात रुजवावी, अशा हेतूने अश्वपूजनाचा प्रारंभ ‘विजयादशमी’च्या दिनी गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी केला. घोडा हा प्राणी मानवी मैत्रीचे प्रतिक तर आहेच शिवाय शक्ती आणि प्रेमाचा संदेशही त्यात आहे. अशा विचारानेच अश्वपूजनाचा सोहळा साजरा केला. आमच्या विचारांची, उपक्रमाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा करून आम्हाला उपकृत केले, अशी भावना दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी व्यक्त केली.
पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंट, शिंदे नगर, आरएल कॉलनीजवळ (गुजरात पेट्रोल पंपासमोरील रस्ता) येथे जळगावमधील बऱ्हाटे कुटुंबियांच्या ‘चंपा’, ‘मंगली’, ‘काली’ ह्या घोड्या आणि घोड्याचे पिल्लू ‘रामा’ यांना आकर्षक पद्धतीने सजून पूजन गुरुवारी, २ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता सोहळ्यास्थळी आणले होते. अशा आगळ्यावेगळ्या अश्वपूजन सोहळ्याचे धार्मिक विधीवत दीपक कुलकर्णी अर्थात डी.के.गुरुजी यांनी पौराहित्य पार पाडले. प्रारंभी दै. ‘साईमत’चे मॅनेजिंग डायरेक्टर परेश बऱ्हाटे यांनी विधिवत पूजन केले. त्यात त्यांचे माता-पिता सौ.सुरेखा आणि प्रमोद बऱ्हाटे यांनीही पूजनात सहभाग घेतला होता.
अनेकांनी अनुभवला सोहळ्याचा आनंद…!
सोहळ्यात मान्यवरांच्या हस्तेही अश्व पूजन करण्यात आले. सोहळ्याचा अनेकांनी आनंद अनुभवला. अशा उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ डॉ.ए.जी.भंगाळे, माजी अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्पेक्ट्रम इंडस्ट्रीचे दीपक चौधरी, सिव्हील सर्जन डॉ.किरण पाटील, माजी प्राचार्य नंदकुमार भारंबे, मल्टिमिडियाचे संचालक सुशील नवाल, कार्यकारी अभियंता पी.पी.वराडे, प्रकाश नाना ढाके, उद्योजक किशोर ढाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या सरिता कोल्हे, सिद्धी इलेक्ट्रॉनिकच्या नूतन पाटील, सरिता खाचणे, माजी पीएसआय भास्करराव पाटील, रवींद्रशेठ नवाल, डॉ.अनुप येवले, बापूसाहेब पाटील, दै. ‘आव्हान’चे संपादक प्रफुल्ल नेवे, ‘लाईव्ह ट्रेंड’चे संपादक शेखर पाटील, शुभदा नेवे, चंद्रशेखर नेवे, दै. ‘नवराष्ट्र’चे संपादक विकास भदाणे, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जुगल पाटील, सुमित देशमुख, मयूर कापसे, अतुल बारी यांचा समावेश होता.