सोहळ्यात पाद्यपूजन, अभिषेक, नामसंकीर्तन, महाआरतीसह प्रसाद वाटपाचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील कुसुंबा येथील सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे स्वामी समर्थ शाळेजवळील सद्गुरू पादुका व कल्पवृक्ष शिवमंदिर, गट नं. ३८६, पुरुषोत्तम पाटील नगरात स.स. दत्ता आप्पा महाराज यांचा १७ वा पुण्यतिथी सोहळा आश्विन शुद्ध अष्टमी, मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. सोहळ्यासाठी सकाळपासून भाविकांची लक्षणीय उपस्थिती राहील. नवरात्री उत्सवानिमित्त कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोहळ्यानिमित्त सकाळी ९.ते ९.३० वाजता पाद्यपूजन, अभिषेक, दासबोध ग्रंथ पूजन व वाचन, ९.३० ते १०.३० वाजता सत्संग, सकाळी १०.३० ते ११.३० वाजता सुनील जाखेटे आणि इस्कॉन परिवाराच्यावतीने नामसंकीर्तन त्यानंतर ११.३० ते १२.३० वाजता महाआरती, पुष्पवृष्टी, कुमारिका पूजन होईल. शेवटी सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप होऊन कार्यक्रमाचा समारोप होईल.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव जगदीश देवरे, उपाध्यक्ष कल्पना वरकड, सदस्य धनराज सावदेकर, भागवत चौधरी, मनोज राजपूत, निर्मला देवरे, अनिल कातोरे, डी. के. चोपडे, शिरीष अमृतकर, प्रदीप कोल्हे, भागवत पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.