‘श्रीं’चे हत्ती वहन आहे
साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :
येथे आज सोमवारी ‘श्रीं’चे हत्ती वहन आहे. हे वहन रात्री ८ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून पूर्वेस नीट वाणी मंगल कार्यालयमार्गे आझाद चौक ते झपाटभवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती, मंदिरातून समोरुन पश्चिमेस नीट भोई गल्लीने श्री राम मंदिरात येईल.तेथून कासार गल्लीने टोळकर गल्ली,भाटे वाडी मार्गे कुंभार वाडा, ओतार गल्ली गांवहोळी चौकापर्यंत येऊन बाजारपेठेतून रथ चौक मार्गे पहाटे ३ वाजता मंदिरात येईल.
आज सकाळी ८ वाजता मंदिरातून बालाजी महाराजांची पालखी निघेल. पालखी रथ चौकातून दक्षिणेस बाजारपेठ गांवहोळी चौक, नगरपालीका चौकातून जुने पोष्ट ऑफीस मार्गे दक्षिणेस डॉ.मोहरीर यांचे दवाखान्याजवळून हायवेने मालक कै.गिरधरशेठ शिंपी यांचे स्मारक (छत्री) जवळ येईल.त्या रस्त्याने पारधी वाड्यातून पूर्वेस अभिजीत फोटो स्टुडीओ पर्यंत परत पूर्वेस पाठक गल्लीने गांवहोळी चौक बाजारपेठ रथ चौकातून दुपारी ३ वाजता बालाजी मंदीरात येईल.