शिबिरात विविध आसनांसह स्वास्थ्यवर्धक तंत्रांचे प्रशिक्षण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील श्रीधर नगर येथे मु.जे.महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथीतर्फे महिलांसाठी योग प्रशिक्षण शिबिर १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर कालावधीत सकाळी ६ ते ७ या वेळेत पार पडले. शिबिरात महिलांना योगाविषयी माहितीसह धडे देण्यात आले. संचालक प्रा.डॉ. देवानंद सोनार आणि मार्गदर्शिका प्रा.डॉ. ज्योती वाघ यांनी सहभागींना योग्य मार्गदर्शन केले. याशिवाय योगशिक्षिका अर्चना गुरव यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
योग प्रशिक्षिका किर्ती गोळे यांनी शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी योग्य रितीने केली. यावेळी सहाय्यक योग प्रशिक्षिका मीनल इंगळे, रजनी जाधव, नम्रता पाटील, स्नेहांकिता पाटील यांची उपस्थिती लाभली.शिबिराद्वारे महिलांना योगाच्या विविध आसनांचे आणि स्वास्थ्यवर्धक तंत्रांचे प्रशिक्षण दिले गेले. ज्यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याचा सूर शिबिरातून उमटला होता.