नवरात्रीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हरिजन कन्या छात्रालयात कन्या पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी, लहान मुलींमध्ये देवीचे रूप मानून ही परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कार्यक्रमात कन्यांना आसनावर बसवून त्यांचे पाय धुणे, स्वच्छ पुसणे, कपाळी तिलक लावणे, फुले अर्पण करणे तसेच भेटवस्तू व फळे देणे अशा पद्धतीने पूजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाद्वारे मुलींमध्ये सणाची पवित्रता आणि नारीशक्तीची जाणीव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, ॲड.सीमा जाधव, वंदना मंडावरे, आशा मौर्य, विद्या जकातदार, हर्षा गुजराथी, नेहा जगताप, तेजल वनरा, प्रतिभा सोनवणे, जान्हवी जगताप, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, डॉ. गणेश पाटील उपस्थित होते.