महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, गुजराती वेशभूषेत जल्लोष ; विजेत्यांना दररोज आकर्षक बक्षीस
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील भुसावळ रस्त्यावरील कालंका माता मंदिर परिसरातील जमुना नगर येथे नवरंग दुर्गोत्सव मंडळाच्यावतीने यंदा नवरात्री उत्सव रंगारंग कार्यक्रमात साजरा होत आहे. यावर्षी नवीन प्रकार म्हणून ‘सावरिया शेठ…..’ गाण्यावर चार टाळीची स्टेप, कानुडो, टेटीडो तसेच गरबा रास आयोजित केले आहेत. दररोज विविध राज्यातील सहभागी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन व गुजराती वेशभूषेत गरबा-दांडिया रास खेळत आहेत. विजेत्यांना दररोज आकर्षक बक्षीस देण्यात येत आहे. त्यामुळे गरबा-दांडियात उत्सव ‘धूम’ रंगली आहे.
नवरंग दुर्गोत्सव मंडळाने यंदा वणी गडाची सप्तश्रृंगी देवीची साडेसात फुटाची मूर्ती येथे स्थापना केली आहे. सकाळ – सायंकाळी ८ वाजता महापूजा, आरती मान्यवरांच्या हस्ते पार पडते. मंडळाचे नूतन अध्यक्ष ॲड. संतोष कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही गरबा, दशमा, दांडिया रासचे आयोजन पार पडत आहे. सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणाऱ्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नरेश बागडे, नंदिता जोशी काम पाहत आहेत.
मंडळाच्या कार्यकारिणीत यांचा समावेश
मंडळाची कार्यकारिणीत अध्यक्ष ॲड. संतोष कोळी, उपाध्यक्ष लोमेश भिरूड, सचिव पंकज चौधरी, कोषाध्यक्ष डिगंबर चिरमाडे, विजय नारखेडे, उमेश पाटील, राहुल नारखेडे, कैलास पाटील, राहुल नेहते, रुपेश नारखेडे, गोकुळ पाटील, विनोद धांडे, सुरेश पाटील, समाधान सोनवणे, हेमंत पाटील यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांचा समावेश आहे. नागरिकांनी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंकज चौधरी यांनी केले आहे.